Ad will apear here
Next
चला, ‘मान्सून फेस्टिव्हल’ला जाऊ या
मुंबई : पावसाळा अनुभवावा तर तो कोकणातला. हिरवीगार भातशेती, कडेकपारीतून कोसळणारे धबधबे, कोकणातील छोटी छोटी खेडी, डोंगरांनी पांघरलेले हिरवे गालिचे मन तृप्त करतात आणि अस्सल कोकणी चवीचे जेवण रसनेला तृप्त करते. 

पावसाळ्यातील कोकण अनुभवता येण्यासाठी ‘कोकण ग्रीनलाइफ हॉस्पिटलिटी’तर्फे दर वर्षी खास ‘मान्सून फेस्टिव्हल’चे आयोजन केले जाते. शुभ्र धबधबे, नेचर ट्रेल, गावांचा फेरफटका, फार्म हाउसमधील वास्तव्य आणि कोकणी पद्धतीने तयार केलेल्या सुग्रास जेवणाची मेजवानी या फेस्टिव्हलमध्ये पर्यटकांना घेता येऊ शकते. इतकेच नाही, तर संध्याकाळी प्रसिद्ध सनसेट पॉइंटवर सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्यसुद्धा पर्यटक अनुभवू शकतात. देशातील वेगवेगळ्या भागातील लोकांना कोकणाचे हे मनोहारी रूप अनुभवता यावे यासाठी त्यांना खास सवलतीही देण्यात येणार आहेत.

पावसाळ्यातील कोकणातील आल्हाददायक वातावरण आणि पर्यटकांची आवड पाहता या ‘मान्सून फेस्टिव्हल’ला गर्दी होणार हे नक्की. तर मग वाट कसली बघताय? या आपल्या कोकणात.. पावसाचे वेगळे रंग अनुभवायला.. 
‘कोकण ग्रीनलाइफ’सोबत कोकणातील निसर्ग आणि आडवाटा अनुभवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

अभिषेक : ९९२३७ ८१०६९
वेबसाइट : www.kokangreenlife.org
ई-मेल : kokangreenlife@gmail.com
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZFWBC
Similar Posts
चक्रीवादळ मुंबईजवळ धडकण्याची शक्यता; अतिदक्षतेचा इशारा मुंबई : अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या काही तासांत अधिक तीव्र झाला आहे. येत्या बारा तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची दाट शक्यता असून, त्यापुढील १२ तासांत त्याचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने आज (दोन जून) सकाळी नऊ वाजता जाहीर केला आहे
समृद्ध कोकण जलचेतना चषक स्पर्धा मुंबई : कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे समृद्ध कोकण जलचेतना चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा कालावधी एक मे २०१७ ते ३० एप्रिल २०१८ असा आहे. याअंतर्गत कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे गांधारी, जगबुडी, अर्जुना व जानवली या चार नद्यांवर पुनरुज्जीवन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जलसंवर्धनाची - जलसमृद्धीची
मान्सून २१ जूनला महाराष्ट्रात! पुणे/मुंबई : वायू चक्रीवादळामुळे मान्सूनच्या वाटचालीवर झालेला दुष्परिणाम आता ओसरला असून, कर्नाटकात येऊन थांबलेल्या मोसमी वाऱ्यांनी गोवा आणि महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. त्यामुळे २१ जून रोजी मान्सून गोवा आणि कोकणात दाखल होणार असून, २४-२५ जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे
मुंबई पर्यटन : माहीम, सायन, धारावी ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात मुंबईतील दादर, परळ वगैरे भागाची माहिती घेतली. आजच्या भागात पाहू या माहीम, सायन (शिव) आणि धारावी.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language